शिनोलीत बैल पोळ्यानिमित्त दुकाने सजली

भीमाशंकर – आंबेगाव तालुक्‍यातील अदिवासी भागात भाद्रपदी बैल पोळ्यानिमित्त आठवडे बाजारात बैलांच्या सजावटीच्या सामानांची दुकाने सजली आहेत. दुकानांमध्ये सामानांची खरेदी करताना शेतकरी मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत.
पुणे जिल्ह्यातील मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्‍यातील अदिवासी भागामध्ये भाद्रपदी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बैलांना अंघोळ घालुण सजावट केली जाते. तसेच त्यांना गोड नैवद्य खायला देउन पूजा केली जातात. तसेच गावात सायंकाळी बैलांची मिरवणूक काढण्यात येते.
बैलपोळ्याचा सण आठ दिवसांवर आल्यामुळे आंबेगाव तालुक्‍यातील आठवडे बाजारातील दुकाने गजबजली आहेत. शेतकरी आपल्या लाडक्‍या बैलांच्या सजावटीसाठी भंडारा, गुलाल, कुंकू, वेगवेगळे रंगबेरंगी कलर, चवरे, घंटी माळ म्होरक्‍या, वेसनी, गंडे, दावे, रेबीन, शेंब्या आदींची खरेदी करताना दिसत आहेत. शेतकरी पोळ्याच्या दिवशी शेतीची कामे बाजूला ठेवून वर्षांतून एकदा आपल्या सर्जा-राजीची सेवा करतात. याविषयी शिनोली (ता. आंबेगाव) येथील बैलाच्या सजावटीच्या सामानाचे व्यापारी इरफान तांबोळी म्हणाले की, दिवसेंदिवस परिसरात बैलांचे प्रमाण कमी होत आहे. घरोघरी आता शेतकऱ्यांनी बैलाच्या जागी छोटे ट्रॅक्‍टर घेतल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)