शितळानगर येथील भुयारी मार्गाचे काम पूर्ण करण्याच्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगीत

देहुरोड – कात्रज-मुंबई बाह्यवळण मार्गावरील देहुरोड, शितळानगर येथील भुयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याचे आश्‍वासन रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापक पी. एल. करीम यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगीत करण्यात आले. येथील भुयारी मार्गाचे व शिंदे पेट्रोल पंपाजवळील सेवा रस्त्याच्या नाल्यावरील पूल काम अनेक दिवसांपासून रखडले होते.

राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांना देहुरोड विकास शिष्टमंडळाने निवेदनाने आज शनिवार दि. 15 ला रास्ता-रोकोचा इशारा दिला होता. सोलोमनराज भंडारे, राजू मारीमुत्तू, परशुराम तेलगु, पंकज तंतरपाळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन केले. रिपाइंचे शिना छाजेड, वैशाली अवघडे, अलोक शर्मा, के. अँडम, डॉ. सुनील लवणे, अमित छाजेड, रमेश पवार, योगेश कसबे, प्रशांत पवार, दिनेश श्रीनिवास, अशोक येलमार, के. एच. सूर्यवंशी, सूर्यकांत सुर्वे, ऍड. बद्रीनाथ तेलगू, अंजनालु नलमाला, रामु विरण, रवी नलमाला यावेळी उपस्थित होते. विशाल मित्र मंडळ व बंधुत्व मित्र मंडळाने आंदोलनाला पाठिंबा दिला.

-Ads-

भुयारी मार्गाचे काम आणि सेवा रस्त्याच्या नाल्यावरील पूल त्वरित करण्याचे आश्‍वासन रिलायन्स कंपनीचे व्यवस्थापक पी. एल. करीम यांनी समितीचे शिष्ट मंडळ व पोलीस उपनिरीक्षक अबुकर लांडगे यांच्या उपस्थितीत दिल्यानंतर आंदोलन स्थगीत करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)