शितपूर येथून पोलिसांनी केले गोमांस जप्त

अकरा जणांवर गुन्हा दाखल, तिघे ताब्यात ः 22 जनावरांची केली सुटका

कर्जत  – कर्जत तालुक्‍यातील शितपूर येथील कुरेशी मळा येथे पोलिसांनी छापा घालून गोमांस जप्त केले. 22 जनावरे ताब्यात घेतली. ही कारवाई बुधवारी (दि. 9) सायंकाळी साडेसहा वाजता ही कारवाई करण्यात आली. कारवाईत आठ लाख 86 लाखांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर सात जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शितपूर नजीकच्या कुरेशी मळ्यात गोवंश मांसाने आयशर व पिकअप ही वाहने भरण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे छापा टाकला. यावेळी गोमांस वाहनांत भरताना आरोपी आढळून आले. तसेच सातशे किलो वजनाची अर्धवट शिर कापलेली सहा मोठी जनावरे ओट्यावर पडलेली आढळून आली. आयशर टेम्पोत (एमएच 48 , एजी 6726) पाचशे किलो व पीकअपमध्ये (एमएच 04, जीआर 4441) 100 किलो गोमांस भरलेले आढळून आले. जिवंत जनावरेही कारवाईत आढळून आली. यामध्ये गावरान जातीचे आठ बैल, नऊ गायी, एक कालवड, एकवीस वासरे यांचा समावेश होता. कारवाईत दोन धारदार सत्तुर, दोन धारदार सुऱ्या, एक वजनकाटा हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी महंमद युसूफ याकूब कुरेशी (वय 40, रा. कुरेशीनगर, कुर्ला, मुंबई), मोहसिन बाबा मिया कुरेशी (वय 37, रा. कोठला झोपडपट्टी, नगर), गणेश शांताराम कुऱ्हाडे (वय 26, रा. आळेफाटा, ता.जुन्नर), सद्दाम इस्माईल कुरेशी, इस्माईल इब्राहिम कुरेशी (दोघे रा. खडकत, ता. आष्टी), गफ्फार कुरेशी, साहिल कुरेशी, साजिद कुरेशी, सिराज, हक्कू (पूर्ण नावे माहीत नाही, रा. मुंबई), अब्दुल हक्क कुरेशी (रा. नगर) या अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल कमलेश हरिदास पाठरुट यांनी फिर्याद दिली आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. पी. माने, पोलीस उपनिरीक्षक मेढे, पोलीस हेडकॉन्स्टेबल लोखंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)