खा. उदयनराजे भोसले यांनी दिली तक्रार;दानपेटीतील रक्कम चोरल्याचा आरोप
सातारा- शिखर शिगंणापूरातील शंभू महादेवाच्या मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरल्याची तक्रार खा. उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. उदयनराजे यांच्या तक्रारीवरून दहीवडी पोलिस ठाण्यात अज्ञात पुजाऱ्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार,खा. उदयनराजे यांनी दहीवडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शिखर शिगंणापूरातील मंदीरात देखभाल करणाऱ्या व पुजा आर्चा करणाऱ्या बडव्यांपैकी अज्ञात बडव्याने मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरली आहे. दाखल तक्रारीचा तपास पोलिस हवालदार एम.जी.राऊत करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)