शिख धर्मात पगडी घालणे अनिवार्य आहे का ?- सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

नवी दिल्ली : शिख धर्मात पगडी घालणे अनिवार्य आहे का ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करताना केला आहे. दिल्लीतील एका व्यक्तीने स्थानिक सायकलिंग असोसिएशनच्या नियमांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला त्यावेळी न्यायालयाने हा प्रश्न उपस्थित केला आहे.

दिल्लीचे सायकलिस्ट जगदीप सिंह पुरी यांनी सायकलिंग असोसिएशनच्या नियमांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायाधीश एस.ए.बोडबी आणि एल.एन.राव सुनावणी करत आहेत. या याचिकेत त्यांनी  असोसिएशनच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला डोक्यावर पगडी असते त्यामुळे आपल्याला हेल्मेट घालणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

५० वर्षीय पुरी यांनी या नियमात आपल्याला सुट मिळावी यासठी त्यांनी न्यायालयास विनंती केली आहे.  त्यावर न्यायालयाने पगडी घालणे आवश्यक नसून केवळ डोके झाकणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी न्यायालयाने मिल्खा सिंह, बिशन सिंह बेदी या खेळाडूंचे उदाहरण दिले आहे. ते मैदानात पगडी न घालता केवळ डोक झाकतात असे म्हटले आहे. तसेच शीख धर्मात पगडी घालणे बंधनकारक आहे का असा सवालदेखील न्यायालयाने यावेळी केला आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)