शिखरशी बोलावे लागत नाही – रोहित शर्मा

दुबई: आशिया चषकातील सुपर फोर फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आपला सहकारी सलामीवीर शिखर धवनची प्रशंसा केली. रोहित म्हणाला की, पहिली 10 षटके व्यवस्थित खेळून काढणे हे आमच्यासमोरचे पहिले लक्ष्य होते. ते यशस्वीपणे पार केल्यानंतर पुढचा प्रवास सोपा होतो. तसेच शिखर धवन सोबत असताना मला फारसे बोलावे लागत नाही. तो एक जबाबदार खेळाडू असून तो भरात असताना प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांवर अक्षरशः अधिराज्य गाजवतो.

आता आम्हाला एकमेकांचा खेळ चांगलाच माहीत आहे. त्यामुळे खेळपट्टीवर असताना फारसे बोलावे लागत नाही. शिखरला जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करता येईल याकडे माझा कल असतो. रोहित आणि शिखरने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या विकेटसाठी केलेली 210 धावांची भागीदारी ही आतापर्यंतची सर्वोच्च ठरली आहे. या जोडीने सचिन-सौरवचा विक्रम मोडला.

-Ads-

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मानेही या सामन्यात शतक झळकावले. तसेच रोहितने या सामन्यात एकदिवसीय कारकिर्दीतला 7 हजार धावांचा टप्पा ओलांडला. या स्पर्धेत रोहित आणि शिखर धवन ही जोडी चांगलीच भरात आहे. शिखर धवनने आतापर्यंत मालिकेत 2 शतके झळकावली आहेत. त्यामुळे यापुढील सामन्यांमध्ये ही जोडी कसा खेळ करते आणि भारताला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देते का याकडे सर्वांचे लक्ष आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
102 :thumbsup: Thumbs up
104 :heart: Love
2 :joy: Joy
29 :heart_eyes: Awesome
34 :blush: Great
5 :cry: Sad
6 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)