जोधपूर: स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आणि अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या आरोपामधील दोषी आसाराम बापू यांनी शिक्षेत सूट मिळण्यासाठी राजस्थानच्या राज्यपालांकडे दयेची याचना केली आहे. पाच वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीवर आश्रमात बलात्कार केल्याच्या आरोपामध्ये दोषी आढळल्याबद्दल जोधपूर न्यायालयाने आसाराम बापूना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आसाराम बापूंनी 2 जुलै रोजी या शिक्षेला उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. मात्र या याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयामध्ये अद्याप प्रलंबित आहे.
दरम्यान सत्र न्यायालयाने सुनावलेल्या आजन्म कारावासाच्या शिक्षेतून सुट मिळावी यासाठी आसाराम यांनी राजस्थानच्या राज्यपालांकडे दयेचा अर्ज केला आहे. राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी आसाराम बापूचा अर्ज गृहमंत्रालयाकडे पाठवून दिला असून या संबंधातील सविस्तर अहवालही मागवला आहे.
जोधपूरमधील मनाइ भागातल्या आसाराम बापूच्या आश्रमामध्ये 16 वर्षाच्या मुलीला बोलावून घेतले गेले आणि 15 ऑगस्ट 2013 च्या रात्री तिच्यावर बलात्कार करण्यात आला अशी तक्रार या मुलीने केली होती. ही मुलगी मूळची उत्तर प्रदेशातील शहाजनपूरची रहिवासी असून मध्यप्रदेशातल्या छिंदवाडा येथील आश्रमामध्येच राहून ती शिक्षण घेत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)