शिक्षिकेसह तिघांना पोलीस कोठडी

शाळेतील 7 वर्षाच्या विशेष मुलाचा शारीरिक आणि मानसिक छळ प्रकरण


आणखी नऊ जणांवर दाखल आहे गुन्हा

पुणे – नगर रस्ता येथील एका नामांकित शाळेत आजारी असलेल्या 7 वर्षाच्या विशेष मुलाचा शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन छळ करणाऱ्या शिक्षिकेसह तिघांना 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
शिक्षिका जसिंता कुमार विल्सन (वय 42, रा. खराडी), शालेय कर्मचारी कुमार मधुकर म्हामुणकर (वय 30, रा. येरवडा) आणि शलिना शहनवाज अडतानी (वय 32, रा. कल्याणीनगर) अशी पोलीस कोठडी झालेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी शाळेचे विश्‍वस्त संदीप गोयंका, अर्चना गोयंका, शिक्षक मेघा दोडेजा, माजी मुख्याध्यापिका शेफाली तिवारी, रिमा खुराणा, निशा शहा, पूजा, सचिन आणि लिनाझ सुनावाला अशा 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित 7 वर्षीय मुलाच्या आईने येरवडा पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना 11 एप्रिल ते 27 सप्टेंबर 2017 या कालावधीत घडली. फिर्यादी यांचा मुलगा मेंदूच्या आजारपणामुळे आजारी आहे. याबाबत शिक्षक, शालेय कर्मचाऱ्यांना माहित आहे. तरीही त्या मुलाचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली शाळेने त्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडून तब्बल 1 लाख 18 हजार रुपये प्रवेश शुल्क आकारले. स्विकारलेल्या शुल्काची पावती दिली नाही. त्या मुलाला विशेष सुविधा न देता त्याचा मानसिक आणि भावनात्मक छळ केला. एक व्यक्ती म्हनून जीवन जगण्याच्या मानमर्यादेच्या अधिकारापासून वंचित केले, असे फियार्दीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात तिघांना अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी विल्सन ही शिक्षिका आहे. तर उर्वरित दोघे शाळेतील कर्मचारी आहेत. त्यांना मुलाच्या आजारपणाबाबत माहिती असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. आजारपणाबाबत तिघांकडे लेखी स्वरूपात माहिती होती का, तिघांवर लहान मुलांचे काळजी आणि संरक्षण अधिनियमातंर्गत आणि शिक्षणाचा अधिकार या अधिनियमांर्गत तिघांवर गुन्हा दाखल आहे. याबाबत सखोल तपास करण्यासाठी आणि उर्वरित गुन्हा दाखल असलेल्यांना अटक करण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)