शिक्षिकेलाच हात धरुन काढले वर्गाबाहेर

शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविल्याचा राग


संस्थेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे – शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिल्याचा राग मनात धरुन परीक्षा सुरू असतानाच एका शिक्षिकेला हात धरुन वर्गाबाहेर काढण्यात आले. हा प्रकार संबंधित शैक्षणिक संस्थेच्या महिला संचालक व त्यांच्या मुलाने केला. तसेच यावेळी इतरसह शिक्षकांनाही शिवीगाळ करण्यात आली. ही घटना आंबेगाव पठार येथील एका शाळेत घडली.

याप्रकरणी एका 34 वर्षीय शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, संचालक मंगल अरुण सोकांडे (48, रा. आंबेगाव पठार पोलीस चौकीसमोर) व अजिंक्‍य अरुण सोकांडे (24) यांच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिर्यादी या आंबेगाव पठार येथील एका शाळेत शिक्षिका आहेत. त्या पहिले ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा घेत होत्या. यावेळी संस्थेच्या सचिव मंगल सोकांडे त्यांचा मुलगा अजिंक्‍य याला घेऊन शाळेत आल्या. त्यांनी शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला का बसू दिले, अशी विचारणा करत फिर्यादीचा हात धरून वर्गाबाहेर काढले. यानंतर त्यांना निलंबनाची धमकी दिली. तसेच सहशिक्षक व विद्यार्थ्यांसमोर अपमानित केले. यानंतर सहशिक्षकांनाही शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. साळुंखे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)