शिक्षण सर्वांपर्यंत पोहविण्याचा प्रयत्न करणार – विशाल सोळंकी

नवे शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी गुरवारी पदभार स्विकारला

पुणे- माझे स्वत:चे शिक्षण हे मराठी माध्यमातून एका गावातून झाले आहे, त्यामुळे एकूणच शिक्षणविषयक मला कायमच आस्था राहिलेली आहे. गेली अकरा वर्षे आसाममध्ये काढल्यानंतर आता मला पुन्हा माझ्या मूळ ठिकाणी येऊन एवढे मोठा शिक्षण विभाग सांभाळायला मिळाला, ही माझ्यासाठी खूप चांगली संधी असून येत्या काळात मी शिक्षण आजवर ज्यांच्यापर्यंत अजुनही पोहचलेच नाही. अशांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न नक्‍कीच करेन, असे मत नवनियुक्‍त शिक्षण आयुक्‍त विजय सोळंकी यांनी व्यक्‍त केले.

राज्याच्या शालेय शिक्षण आयुक्‍त पदाचा कार्यभार सोळंकी यांनी गुरुवारी (दि. 19) हाती घेतला. त्यानंतर दैनिक प्रभातने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, सध्या तरी मी एकूणच शिक्षण विभागाची ही खूप मोठी व्याप्ती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. शिक्षण विभागाच्या अनेक योजना, त्यांसंबंधीची परिपत्रके, कायदे यांचा अभ्यास करतो आहे. माझ्या दृष्टीने शिक्षण ही एक बाजू नसून त्याला अनेक बाजू आहेत. त्यामध्ये चांगल्या योजना, चांगल्या सोयीसुविधा, चांगले शिक्षक, योग्य अभ्यासक्रम, योग्य मुल्यमापन पद्धत्ती या सर्व बाबी आहेत. त्यामुळे शिक्षण ही एक परिपूर्ण गोष्ट असून पालक, शिक्षक, विद्यार्थी अशा सर्व घटकांचा अभ्यास करुन त्यांचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न मी माझ्या येत्या काळात करेन असेही त्यांनी यावेळी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)