शिक्षण समितीत केवळ नगरसेवकच असण्याची शक्‍यता

विधी विभागाचा अभिप्राय लवकरच येणार
पुणे, दि.10 – महापालिकेच्या वतीने स्थापन केल्या जाणाऱ्या समितीमध्ये केवळ नगरसेवकांचा समावेश होण्याची शक्‍यता आहे. शिक्षण समितीत कोण असावे याबाबत विधी विभागाचा सल्ला मागितला होता त्यानंतर लवकरच विधी विभागाकडून याबाबत अभिप्राय देण्यात येणार आहे.
महापालिका शिक्षण मंडळाच्या बरखास्तीनंतर तब्बल वर्षभराने महापालिका प्रशासनाने पालिकेची शिक्षण समिती स्थापन करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. मात्र, ज्या कायद्यानुसार, ही समिती स्थापन केली जाणार आहे. त्या कायद्यात स्पष्टता नसल्याचे कारण पुढे करत हा समिती स्थापन करण्याचा निर्णय महापालिकेच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत या संदिग्धतेबाबत स्पष्टीकरण येण्यासाठी महापालिकेच्या विधी विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला आहे. या समितीमध्ये 26 सदस्य ठेवून त्यात 13 नगरसेवक तर 13 स्वीकृत सदस्य घ्यावेत, अशी भाजपची भूमिका आहे. मात्र, त्यामुळे पुन्हा ही समिती शिक्षणमंडळासारखी राजकीय पुनर्वसन समिती होईल, अशी भीती विरोधी पक्षांनी व्यक्‍त केल्याने, समितीबाबत बैठकीत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव विधी विभागाच्या अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता. मात्र, आता त्यावर विधी विभागाने अभ्यास केला असून याचा अहवाल लवकरच जाहीर केला जाणार आहे.

बाहेरच्या सदस्यांचा नसणार समावेश
याबाबत विधी विभागातील अधिकारी दैनिक “प्रभात’शी बोलताना म्हणाले, याबाबत अद्याप अंतिम अभिप्राय आमच्या विभागाने दिलेला नाही. मात्र, प्राथमिक अभ्यासावरून असे दिसून येते की, यात नगरसेवकांचा समावेश करता येईल, मात्र अन्य कोणाचा त्यात समावेश करता येईलच असे नाही. जर करायचाच असेल, तर तो निर्णय सभागृहाला घ्यावा लागेल. कलम 34 नुसार बाहेरच्या सदस्यांचा समावेश करता येणार नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)