शिक्षण समितीच्या दिल्ली दौऱ्यावर सव्वा लाखांचा खर्च

पिंपरी – शिक्षण समितीचे अधिकारी व महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा दिल्ली दौरा केला. या दौऱ्यासाठी एकूण सव्वा लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

महापालिका स्थायी समितीसमोर या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. स्थायी समितीची बैठक येत्या मंगळवारी (दि.30) होणार आहे. दिल्लीतील आदर्श शाळा व तेथील आदर्श रुग्णालय पाहण्यासाठी विरोधी पक्षनेते, शिक्षण समितीच्या सभापती व शिवसेना गटनेते, मनसेचे गटनेते व शिक्षण समितीचे इतर सदस्य व अधिकारी असे 22 सदस्यांचे शिष्टमंडळ 8 व 9 ऑक्‍टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी अभ्यासाचा “दिल्ली पॅटर्न’ शिष्टमंडळाने जाणून घेतला. त्यांच्या या दोन दिवसीय दौऱ्याला तब्बल 1 लाख 18 हजार 114 रुपयांचा खर्च आला असल्याने या खर्चासाठी स्थायी समितीच्या समोर विषय मांडण्यात आला आहे. या खर्चाला थेट पद्धतीने मान्यता देण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्ली येथील शाळांमधील सुधारणा आपल्या शाळांमध्येही व्हावी यासाठी शिक्षण मंडळ काही शिक्षक दिल्ली येथे 15 दिवसांसाठी पाठवणार आहे तर दिल्लीचे काही शिक्षक पिंपरी-चिंचवड येथे येणार आहेत, असे या मंडळातर्फे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी व कशी याबाबत मात्र 15 दिवस उलटून गेले तर कोणतीही रुपरेषा किंवा बदल शिक्षण समितीतर्फे अद्याप तरी करण्यात आलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)