शिक्षण समितीची पहिली सभा 19 जुलैला

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समितीची पहिली सभा गुरूवारी (दि. 19) होणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरूवारी समितीच्या सभा होणार आहेत. स्थायी समिती सभागृहात दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे.

सभापती प्रा. सोनाली लांडगे या सभेचे अध्यक्षस्थान भुषवतील. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडीत असलेल्या शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली. त्यामुळे केंद्रीय कायद्याअंतर्गत राज्यातील सर्व महापालिकांमधील शिक्षण मंडळे बरखास्त करण्यात आली होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर त्याठिकाणी नऊ नगरसेवकांचा समावेश असलेल्या शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यामध्ये संख्याबळानुसार नगरसेवकांना संधी देण्यात आली आहे.

या समितीवर मंडळाप्रमाणे 15 सदस्य संख्या घटून विविध विषय समितीप्रमाणे 9 नगरसेवकांची ही समिती आहे. त्यामध्ये भाजपकडून प्रा. सोनाली गव्हाणे, सुवर्णा बुर्डे, शर्मिला बाबर, शारदा सोनवणे, संगीता भोंडवे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विनया तापकीर, राजू बनसोडे, उषा काळे आणि शिवसेनेकडून अश्‍विनी चिंचवडे यांची नुकत्याच झालेल्या महासभेत शिक्षण समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)