शिक्षण समितीचा दिल्ली दौरा

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड महापालिकेची शिक्षण समिती व अधिकारी “सीबीएसई पॅटर्न’चा अभ्यास करण्यासाठी दिल्लीला दोन दिवसांचा पाहणी दौरा करणार आहेत.

दिल्लीतील आप सरकारने शाळांचे रुप पालटले असून सरकारी शाळा या पूर्णपणे डिजीटल केल्या आहेत. त्यामुळे या सरकारी शाळांचा पट हा खासगी इंग्लिश मीडियमच्या शाळेएवढा वाढला आहे. याच धर्तीवर महापालिकेच्या शाळाही सुधाराव्यात या दृष्टीकोनातून महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते, शिक्षण समितीचे पदाधिकारी हे सोमवारी (दि. 8) व मंगळवारी (दि. 9) हा दौरा होणार आहे.

-Ads-

दिल्लीच्या आप सरकारने शाळांमध्ये खेळासाठी व इतर कलागुणासाठी वेगळे वर्ग निर्माण केले आहेत. तसेच शाळेमध्ये मुलांना केवळ पुस्तकी शिक्षण नाही तर स्वसंरक्षणाचे धडे देखील बंधनकारक केले आहेत. येथील सर्व वर्ग हे डिजीटल करण्यात आले आहेत. तसेच शाळांमध्ये वर्षातून केवळ दोन परीक्षा बंधनकारक केल्या आहेत. शाळा इमारत व स्वच्छता यावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. या साऱ्या कामांचे नियोजन व अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी हा अभ्यास दौरा केला जाणार आहे. तसेच शाळांबरोबर यावेळी दिल्ली सरकारच्या महौल्ला रुग्णालयाची पाहणी केली जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)