शिक्षण समितीकडून 96 शाळांची पाहणी

पिंपरी – महापालिका शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण समितीतर्फे सुरु केलेला “शाळा भेट’ हा उपक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. शहरातील महापालिकेच्या 105 शाळांपैकी 96 शाळांना या उपक्रमांतर्गत भेट देण्यात आलेल्या आहेत.

महापालिकेच्या शाळा भेट या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, शिक्षकांच्या समस्या व त्या सोडविण्यासाठी उपाययोजना, शाळांची सद्यस्थितीची पाहणी या उपक्रमांतर्गत केली आहे. या उपक्रमात महापौर, शिक्षणाधिकारी, शिक्षण सभापती, सदस्य हजर राहतात. शाळा भेटीत काही शाळांची स्थिती दयनीय झाल्याचे आढळल्याने त्यावरती संबंधितांना तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. तसेच, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बाकडी नव्हती. तसेच, इतर दैनंदिन समस्यांने विद्यार्थ्यांना ग्रासले होते. या उपक्रमांतर्गत या समस्या सोडविण्याचा प्रयत्न शाळा भेटच्या माध्यमातून केला आहे.

शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व तळवडे शाळेतील शिक्षक मनोज मराठे म्हणाले, या उपक्रमामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून त्या सोडविण्याचे प्रयत्न निश्‍चितपणे कौतुकास्पद आहेत. तसेच, शिक्षण समितीचा शाळेतील शिक्षक, विद्यार्थी यांच्यांशी होत असलेल्या संवाद, समन्वयात सातत्य राहिल्यास शैक्षणिक गुणवत्ता वाढेल. महापालिकेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने फायदेशीर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)