पिंपरी – महापालिका शिक्षण समितीच्या सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांच्या दिमतीला नवी कोरी मोटार खरेदी केली जाणार आहे. याशिवाय फ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या अभियंत्याला देखील नवीन मोटार मिळणार आहे.

टाटा कंपनीच्या झेस्ट मॉडलच्या दोन मोटारी खरेदी केल्या जाणार असून 11 लाख 17 हजार 284 रुपये खर्चाच्या ऐनवेळच्या विषयाला स्थायी समितीने मान्यता दिली. अडीच महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेची शिक्षण समिती अस्तित्वात आली आहे. तत्कालीन शिक्षण मंडळ सभापतीच्या वापराकरिता हिंदुस्तान मोटर्स कंपनीची अँबेसिडर कार उपलब्ध आहे. ही मोटार 14 वर्षे 8 महिने जुनी असून, आतापर्यंत या वाहनाच्या दुरुस्तीसाठी 9 लाख, 13 हजार 371 रुपये खर्च करण्यात आला आहे.

याशिवाय फ क्षेत्रीय कार्यालयाच्या वापरात असलेली दुसरी अँबेसिडर मोटार वारंवार नादुरुस्त होत आहे. त्यामुळे विकास कामांची पाहणी करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नवीन मोटार मिळण्याची मागणी केली आहे. याशिवाय वाहन कार्यशाळेच्या अहवालानुसार या दोन्ही मोटारी निर्लेखित करण्याचे सुचविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)