शिक्षण संक्रमण संपादन मंडळावर संदीप वाकचौरे यांची निवड

नगर – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या शिक्षण संक्रमणाच्या निमंत्रित संपादक मंडळावर संदीप वाकचौरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंडळाच्या वतीने राज्यातील शिक्षक, संस्थाचालक, विद्यार्थी, पालकांना शैक्षणिक क्षेत्रात मदत व्हावी, म्हणूनी शिक्षण संक्रमण हे सातत्याने प्रकाशित करण्यात येत आहे. राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात या मासिकास मान्यता आहे. माध्यमिक स्तरावरील शिक्षकांना नव्या शैक्षणिक धोरणाच्या प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शक म्हणून या नियतकालिकाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे वर्गातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया समृद्ध करण्यात या नियतकालिकाचा वाटा आहे. एकासाठी निमंत्रित संपादन मंडळ असून त्या मंडळात सदस्य म्हणून वाकचौरे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत विषय सहाय्यक पदावर कार्यरत आहे. वाकचौरे हे माध्यमिक क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त असून गेले अनेक वर्षे सातत्याने शिक्षण विषयावर लेखन करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ही संधी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे, माजी शिक्षण संचालक शिवाजीराव तांबे, मंडळाचे सचिव अशोक भोसले, प्राचार्य डॉ. अचला जडे, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे,उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, उमेश डोंगरे, परसराम पावसे, पोपट काळे आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)