शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘हा’ सिनेमा येतोय लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

एखाद्या व्यवस्थेतील गुण-दोष दाखवण्यामागे त्यात योग्य ती सुधारणा व्हावी इतकाच या सिनेमांमागील हेतू असतो. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारा ‘बे एके बे’ हा मराठी सिनेमा शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा असून समाजातील सत्य परिस्थिती मांडणारा आहे.

या सिनेमाच्या निमित्ताने अशिक्षित समाजाची मानसिकता आणि शिक्षणाबाबतची त्यांची उदासीनता अधोरेखित करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संचित यादव यांनी केला आहे. या सिनेमाबाबत यादव म्हणाले की, हे केवळ महाराष्ट्रातील एका गावातील चित्र नसून, आजही आपल्या देशातील अनेक दुर्गम भागात हेच दृश्य पाहायला मिळतंय. ‘बे एके बे’ या सिनेमातील शाळा त्यांचं प्रतिक असल्याचं मानून जरी हा सिनेमा पाहिला तरी समाज बदलाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं जाईल असं वाटतं. या सिनेमात कोणालाही उपदेश देण्यात आलेला नसून, एका साध्या सोप्या गोष्टीच्या माध्यमातून सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)