शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर करण्याची गरज – पाटील

पुणे – औद्योगिक क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रामध्ये संवाद नसल्यामुळे आपण जागतिक पातळीवर टिकू शकत नाही. आपल्याकडील संशोधनही निराशाजनक असून शिक्षण व्यवस्थेतील दोष दूर करण्याची गरज आहे, असे मत भारती विद्यापीठाचे कार्यकारी संचालक डॉ. एस. एफ. पाटील यांनी व्यक्त केले.

“द फर्ग्यूसनियन्स’ या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे “फर्ग्युसन अभिमान’ आणि “फर्ग्युसन गौरव’ पुरस्कार प्रदान वेळी ते बोलत होते. न्यूरोसर्जन डॉ. चारुदत्त आपटे, दिग्दर्शिका सई परांजपे, निवृत्त एअर मार्शल एस. एस. रामदास, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांना फर्ग्यूसन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीएस्सीच्या प्रथम वर्षाची विद्यार्थिनी तसेच जलतरणपटू आर्या राजगुरू आणि बुद्धिबळ खेळाडू सलोनी सपाळे यांना “फर्ग्युसन गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे, टी. बी. बहिरट, संघटनेचे अध्यक्ष अॅड. विजय सावंत उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाटील म्हणाले, शिक्षण संस्थांची संख्या ज्या वेगाने वाढली त्या वेगाने शिक्षणाचा दर्जा मात्र सुधारला नाही. जागतिक स्तरावर पाहता आपल्याकडील संशोधनाचा दर्जा सुमार आहे. जागतिक पातळीवर आपले मानांकन सतत खाली येत आहे. औद्योगिक आणि शिक्षण क्षेत्रात सुसंवाद घडल्यास आणि शिक्षकांनी मनावर घेतल्यास हे चित्र पालटू शकते, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्‍त केला. पुरस्कारार्थ्यांनी फर्गसन महाविद्यालयातील व्यतित केलेल्या कालखंडातील आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. सावंत यांनी केले. तर, आभार प्रदर्शन श्रीनिवास पेंडसे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)