शिक्षण महर्षि कृष्णराव भेगडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

तळेगाव दाभाडे – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचालित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मावळ भूषण, शिक्षण महर्षि कृष्णराव भेगडे व माजी नगरसेविका मंगला काकडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, भाजप प्रवक्‍ता गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उप नगराध्यक्ष संग्राम काकडे, इंद्रायणी इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक बाळासाहेब शेळके, नगरसेवक संदीप शेळके, इंद्रायणी महाविद्यालयाचे सदस्य सुरेशभाई शहा, उद्योजक संजय साने, ज्येष्ठ नेते माउली दाभाडे, नूतन विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य मुकुंद खळदे, कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक चंद्रकांत काकडे, अध्यक्ष संदीप काकडे, अध्यक्ष डॉ. दिलीप भोगे, प्रशांत शहा, अनिल तानकर, गौरी काकडे प्रमुख पाहुणे होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अध्यक्ष संदीप काकडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली व शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर केक कापून दोनही मान्यवरांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, डॉ. भोगे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मावळचे आमदार बाळा भेगडे यांनीही शुभेच्छा दिल्या. विद्यार्थांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, तुम्हाला जर व्यक्‍तीमत्त्व म्हणून कृष्णराव भेगडे यांसारखे व्हायचे असेल, तर चांगला अभ्यास करावा लागेल. कृष्णराव भेगडे यांनी भाषणात शाळेचे कौतुक केले. आपल्या नावाने सुरू केलेल्या या शाळेने आपले नाव सार्थक केले, असे ते म्हणाले. त्यांनी या संस्थेला वडगाव येथे एक नवीन शाळा सुरु करण्याकरिता एक एकर जमीन देण्याचे हमीपत्र दिले.

या सर्व पाहुण्यांमुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. या कार्यक्रमात मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रुपाली जगताप यांनी सूत्रसंचालन केले. अध्यक्ष संदीप काकडे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)