शिक्षण मंडळाच्या गणित प्रशिक्षण वर्गाचा समारोप

चिंचवड – महाराष्ट्र विद्या प्राधिकरण महाराष्ट्र शासन व पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या तीन दिवसीय गणित प्रशिक्षण वर्गाचा समारोप झाला. चिंचवड स्टेशन येथील महात्मा फुले महाविद्यालयात हा प्रशिक्षण वर्ग पार पडला. त्याला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समारोपावेळी गणित तज्ज्ञ बाळासाहेब थोरात प्रशिक्षण वर्गाविषयी माहिती देताना म्हणाले की, संख्याज्ञान हा गणिताचा मुख्य आधार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया विकसित करणे तसेच अध्ययन स्तर निश्‍चित करुन शिक्षकांची क्षमता या प्रशिक्षणात विकसित करण्यात आली.

यावेळी रसिका परब, मीना गायकवाड, अनिता जगताप, सहदेव म्हस्के, सूर्यकांत राठोड या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थी शिक्षक संजय कोरके, संदीप भोते, सुवर्णा मुसळे, सुरेखा डांगे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सूत्रसंचलन सी. के. गोयल शाळेचे उपमुख्याध्यापक बाळू महाजन यांनी केले. बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)