शिक्षक बदल्यांबाबत खोट्या पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

संग्रहित फोटो

 अधिकृत माहितीकेंद्र सुरु करा: शिक्षकांची मागणी
पुणे- शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन होणार याची घोषणा झाल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमणात शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत, तसेच त्या खूप दूरवर व हजारो शिक्षकांच्या होणार आहेत अशा पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाल्या आहेत. शिक्षण बदल्यांसंदर्भात अधिकृृत माहिती देण्यासाठी कोणतीही अधिकृत यंत्रणा शिक्षण विभागाने जाहीर केलेली नाही. त्यामुळेच काय खरे काय खोटे अशा पेचात राज्यातील शिक्षक पडले आहेत. त्यामुळेच शिक्षकांना विविध प्रकारची माहिती देण्यासाठी शासनाने अधिकृत संकेतस्थळ किंवा ब्लॉग जाहीर करावा अशी मागणी शिक्षकांकडून केली जात आहे.
राज्यातील शिक्षकांच्या बदल्यांच्या विषयाला सर्वोच्च न्यायालयात शिक्षक संघटनांतर्फे आव्हान देण्यात आले होते. मात्र त्याचा निकाल शासनाच्या बाजूने लागल्यानंतर शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला व त्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षात या बदल्या होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान याबाबत समाजमाध्यमांमध्ये काही पोस्ट फिरत आहे. शिक्षण विभागाने नॅशनल इन्फोमॅटिक सेंटरवर नियुक्‍ती केलेले मुळचे शिक्षक असणारे प्रदीप भोसले यांच्या नावे या पोस्ट फिरत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली आहे.

शिक्षक म्हणतात..
राज्य शासनाने भोसले यांची नियुक्‍ती सरल या संगणक प्रणालीचे काम पहाण्यासाठीही केली होती. मात्र त्या वेळीही त्यांची नेमणूक केल्याची अधिकृत माहितीच नसल्याने शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण पहायला मिळत होते. तसेच शिक्षण बदली धोरणासंदर्भातही दिसून येते आहे. भोसले यांची निवड बदली धोरण राज्य समन्वयक पदी केल्याची कोणतीही अधिकृत माहिती शासनाने दिलेली नाही. त्यामुळे कोणाचे आदेश, कोणच्या सूचना खऱ्या मानाव्या असा प्रश्‍न पडला आहे. शासनाने परिपत्रक जाहीर करत कोणचे आदेशाचे पालन करावे याची कृपया आम्हाला माहिती द्यावी.

ब्लॉगवरील माहितीनुसार..
काही दिवसांपासून बदली संदर्भात सोशल माध्यमात माझ्या नावाने खोट्या पोस्ट व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. अशा पोस्ट पाठविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सोमवारी गुन्हा नोंदविला जाणार असून ग्राम विकास विभागाकडून देखील कडक कारवाई केली जाणार आहे याची नोंद घ्यावी.खोट्या पोस्ट वर कोणीही विश्वास ठेवू नये,ही विनंती. खोट्या पोस्ट वर विश्वास ठेवून त्याप्रमाणे कार्यवाही झाल्यास त्यासाठी व्यक्तीशः आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी. ग्राम विकास विभागाचे पत्र व राज्यसमन्वयक म्हणून सर्वांना सविस्तर माहिती होण्यासाठी ब्लॉग वर उपलब्ध करून दिलेली सुविधा याच अधिकृत स्रोतांवर विश्वास ठेवून त्याबाबत कार्यवाही करावी ही विनंती असेही भोसले यांच्या ब्लॉगवर म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)