शिक्षण, पर्यावरणावर जोर देणारे एकता मित्र मंडळ

पिंपरी – पिंपरी येथील अजमेरा कॉलनीतील एकता मित्र मंडळाने गणेशोत्सवासोबतच वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे जणू काही व्रतच घेतले आहे. मंडळाचा लहान मुलांचे शिक्षण आणि पर्यावरण जपण्यावर विशेष जोर आहे.

मंडळाचे अध्यक्ष कौशल रावल यांनी दै. “प्रभात’शी बोलताना सांगितले की, शिक्षण आणि पर्यावरण या दोन अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. येणारी नवी पीढी शिक्षित असणे आणि पर्यावरणाचा समतोल साधला जाणे या देशाच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्‍यक अशा बाबी आहेत. या दिशेने मंडळ नेहमीच प्रयत्न करत राहते. गरीबी शिक्षणाच्या आड येऊ नये यासाठी जेवढे शक्‍य होतील तेवढे प्रयत्न मंडळ आपल्या परीने करत असते. गरजू मुलांना शिक्षणासाठी आवश्‍यक असणारे सर्व साहित्य पुरविण्याचा आमचा प्रयत्न असतो. केवळ गणेशोत्सव पुरते नव्हे तर वर्षभर आम्ही हे उपक्रम राबवितो. त्याच प्रकारे पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन गरजेचे आहे. वर्षातून किमान तीन ते चार वेळा आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करतो. केवळ वृक्ष लावून जबाबदारी संपत नाही तर त्या वृक्षांचे संगोपन ही व्हावे या दृष्टीने मंडळातील कार्यकर्ते वैयक्‍तिक पातळीवरही खूप श्रम घेतात.

त्याच प्रमाणे आपल्या उमेदीच्या काळात समाजासाठी बरेच काही करणारे आणि आयुष्याच्या उतरणीला वृद्धाश्रम नशिबी आलेल्या ज्येष्ठांच्याही मंडळाचे कार्यकर्ते संपर्कात असतात. ज्यांनी समाजाला भरभरुन दिली त्यांची आबाळ होऊ नये यासाठी आम्ही वृद्धाश्रमात धान्य वाटप करत असतो. वृद्धाश्रमांसाठी अजूनही बरेच काही करण्याची कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे आणि आम्ही त्या दिशेने नक्‍कीच प्रयत्न करणार आहोत. यावर्षी गणेशोत्सवात मंडळाने आरोग्य शिबिराचे ही आयोजन केले होते. त्याचा स्थानिक नागरिकांना बराच फायदा झाला.

अध्यक्ष कौशल रावल, उपाध्यक्ष नितिन कुलकर्णी, सेक्रेटरी अमित मेहता, सह सेक्रेटरी जित घोष, किरण देंडे, खजिनदार सागर शितोळे, निशांत मराठे, सह खजिनदार केतन कंद, निलेश शितोळे, कार्याध्यक्ष चंद्रशेखर पाळेकर, रविंद्र वर्मा, व्यवस्थापक तुषार मेहता, मिलिंद कुलकर्णी, सल्लागार ऍड सचिन पाळेकर, सदस्य मनोज कुलकर्णी, अक्षय नरवडे, शेखर राजपुरोहित, अनिकेत पाटील, शंतनु भोसले, अनूप नायर, विशाल गाडेकर, महेश कोळपकर, अभिजीत हुंडेकरी, मंगेश रोडे, साजन अब्राहम, समीर रासने, गौरव चौधरी, उमेश देडे, मनोज शेट्‌टी, जितेंद्र सिंग, नितीन सिंग, राजेंद्र कुंभार, दुर्गेश दाभोळकर, पार्थ राजपुरोहित, राजन पटेल, रोहिल कुंभार, करण कंद, ऍड कृष्णा कंठेकर, सागर कदम, अमोघ पाटील, अझहर कुरैशी, गौरव छाब्रा, शॅंको पोद्‌दार, विजय सिद्‌दपुरा, विवेक नायडू, राहुल रासने, गणेश पवार, प्रविण चौधरी, सुशील कोटियान, प्रिन्स वर्दी, तेजस देशमुख, राजेश लक्ष्मण, आनंद बुरड, सन्मय देशमुख, प्रथमेश कुलकर्णी, आर्णव जोशी, तन्वी कुलकर्णी, माही मेहता, हिंदवी पाळेकर, आर्णवी रावल, विराज शितोळे, सुजय सनक्‍के, स्वरुप पाळेकर, कल्याणी शिंदे, सर्वेश कुलकर्णी, शिवानी कोळपकर, अदिती पाटील अशी कार्यकर्त्यांची मोठी फौज मंडळाकडे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)