‘शिक्षण पद्धतीनुसार विचार करायला शिकवा’

पुणे – संपूर्ण भारतामध्ये शालेय वयातील सर्व विद्यार्थी झाडे, सूर्य, नदी आणि एक खिडकी असणारे घर असे निसर्गचित्र काढतात, अशा पद्धतीचे साचेबद्ध चित्र न काढता त्यांना शिक्षण पद्धतीनुसार विचार करायला शिकवले पाहिजे, असे ज्येष्ठ कथा अणि पटकथाकार जावेद अख्तर म्हणाले.

सिम्बायोसिस सांस्कृतिक महोत्सवांतर्गत जावेद अख्तर यांच्या हस्ते सिम्बायोसिसचे माजी विद्यार्थी आदित्य सरपोतदार यांना “सांस्कृतिक पुरस्कार’ देण्यात आला. त्यांना शाल, स्मृतिचिन्ह, फळे देत त्यांचा सन्मान केला. त्याचबरोबर भरत नाट्य संशोधन मंदिर, भारत गायन समाज, आर्य संगीत प्रसारक मंडळ, मनीषा नृत्यालय आणि आशय फिल्म क्‍लब या कलाक्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांना रुपये पंचवीस हजार आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी चित्रपट दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, जावेद अख्तर, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळेत असताना केलेला “व्हिज्युअल प्रोजेक्‍ट’ महत्त्वाचा ठरला. तेव्हापासून काहीतरी वेगळे करण्याची सवय लागत गेली. माझ्या जडणघडणीमध्ये “सिम्बायोसिस’चा महत्त्वाचा आणि मोठा वाटा आहे, असे आदित्य सरपोतदार मनोगतामध्ये म्हणाले.

इंग्रजी भाषेबरोबर आपली मातृभाषा देखील यायला हवी. आपली भाषा ही संस्कृती आणि परंपरेशी जोडलेली असते, असे सांगत “जबान और जमिन जुडे होते है’ असे अख्तर म्हणाले. सिम्बायोसिसमध्ये साचेबद्ध शिक्षण पद्धतीमध्ये गुंतबून न ठेवता विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्‍तीला वाव मिळतो, असेही अख्तर म्हणाले. यावेळी डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. विश्वास मेहेंदळे, डॉ. विद्या येरवडेकर यांनीही मनोगते व्यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)