शिक्षण क्षेत्रात वारंवार प्रयोग नकोत

मंचर- शिक्षण क्षेत्रात सध्याच्या काळात अनेक प्रयोग केले जातात. “फिड बॅक’च्या नावाखाली असे प्रयोग राबवून शिक्षणाचा दर्जावर परिणाम होण्याची भीती व्यक्‍त केली. म्हणून शिक्षण क्षेत्रात वारंवार प्रयोग नकोत, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती तथा उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी व्यक्‍त केले.
आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 69 वी वार्षिक सर्वसाधारण सभासभापती विजय सोपानराव वळसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते.पंचायत समिती उपसभापती नंदकुमार सोनावले, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, संजय गवारी, भगवान ढुमणे, महामुनी, उपसभापती बाळासाहेब राऊत, खजिनदार जयश्री घोडेकर, मानद सचिव राजेंद्र चासकर, राज्यउपाध्यक्ष महेश बढे, तालुका संघाचे अध्यक्ष विजय घिसे, राज्य सहचिटणीस जितेंद्र हांडे, नारायण गोरे, उदयकुमार लोंढे, संचालक नंदकुमार चासकर, सचिन तोडकर, राजाराम काथेर, महेश शिंदे, संतोष गाढवे, रवींद्र थोरात, मंगेश जावळे, संजीव ढोंगे, संगीता इंदोरे, जयश्री मिडगे, राहुल रहाटाडे, कांतीलाल दंडवते, मुबीन मुंढे, कल्पना अभंग उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे मयत सभासद कै. अनिल कंधारे यांच्या वारसास सभासद कल्याण निधी योजनेतून 8 लक्ष रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक, विविध संस्थावर निवड झालेले सभासद शिक्षक, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक, गुणवत्ताधारक विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, विशेष पदवीधारण केलेले शिक्षक, दहावी व बारावीमध्ये गुणवत्ता यादीत आलेले सभासदांचे पाल्य यांचा सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)