शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा

बारामती- शिक्षण क्षेत्रात खुप मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. तसेच अमुलाग्र बदलही होत आहेत. स्पर्धेच्या या युगात देखील ज्ञानवंत, चारीत्र्यवंत व नितिवंत विद्यार्थ्यांची पिढी घडणे गरजे आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार अजित पवार यांनी व्यक्‍त केले.
सिंगापूर फ्यूचर स्कूल प्रोग्रामची प्रेरणा घेऊन कृष्णाई फाउंडेशनच्या वतीने बारामती येथे साकारण्यात आलेल्या “दि अल्फा फ्यूचर स्कूल’ या भारतातील पहिल्या निवासी शाळेचे उद्‌घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भारतातील फ्यूचर स्कूल संकल्पनेचे प्रमुख डॉ. मनोज सिंह, जिल्हा परिषेदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, बारामती टेक्‍सटाईल्स पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, ज्येष्ठ शास्त्रज्ञ योगेंद्र वाडसकर, कोलते पाटील डेव्हलपर्सचे राजेश पाटील, कार्यकारी संचालक मिलिंद कोलते अनिशा एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापकिय विश्‍वस्त अनिशा पाटील, कृष्णाई फाउंडेशनचे अध्यक्ष कीरण गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, सध्या गुणवत्तेचे दिवस आहेत. “दि अल्फा फ्यूचर स्कूल’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी जगाशी जोडले जाणार आहेत. अशा प्रकारच्या शिक्षणसंस्था उभ्या करण्यासाठी जिद्द, चिकाटी तसेच धाडस लागते. कृष्णाई फाउंडेशनचे अध्यक्ष किरण गुजर यांनी काळाची पाऊले ओळखुन आशा प्रकारच्या शैक्षणिक संस्थेची बारामती येथे निर्मिती केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षणाची कवाडे बारामती शहरात खुली झाली आहेत. या विद्यालयात मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत तसेच लॅटीन या पाच भाषेमधून शिक्षण दिले जाणार आहे. त्याबरोबर समता, मानवता, मैत्री, आदाराची भाषा शिकवणे देखील महत्त्वाची आहे. जागतिक दार्जाची शिक्षण पद्धती असल्याने त्याचे प्रवेश मुल्य देखील तसेच आहे. मात्र काही टॅलेंटेड असलेल्या अनाथ विद्यार्थ्यांचा भार विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्था उचललेल, अशी ग्वाही पावार यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)