शिक्षण उपसंचालक, सहायक शिक्षण संचालक यांच्यावर ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा

पुणे – मॉडर्न महाविद्यालयातील दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबनाचा कालावधी उलटूनही त्यांना कामावर न घेता न्यायालयात खोटी माहिती देऊन दिशाभूल करत त्रास देण्यात आला. याप्रकरणी विभागीय शिक्षण उपसंचालक, सहायक संचालक व विस्तार अधिकारी या तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत, विस्तार अधिकारी सुनील गायकवाड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिक्षक दिलीप खंडाळे (48, रा. समता नगर, नवी सांगवी) यांनी बंडगार्डन पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप खंडाळे आणि प्रा. लक्ष्मीकांत शेरखाने हे दोघे मॉडर्न आर्टस सायन्स व कॉमर्स महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करीत होते. परंतु, काही कारणास्तव संस्थेने त्यांना निलंबित केले. मात्र, निलंबनाचा कालावधी संपला असून आम्हाला पुन्हा हजर करून घेण्यात यावे असा अर्ज त्यांनी संस्थेला केला. मात्र, प्राचार्यांनी त्यांचा अर्ज स्विकारला नाही. यामुळे या दोघांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार अर्ज दिला होता. तो पोस्टाने पाठविण्यात आला होता. त्यानंतरही त्यांना हजर करून घेतले नाही.

त्यानंतर संस्थेकडून दोघांना 19 ऑगस्ट 2016 रोजी बडतर्फ करण्यात आले. बडतर्फ केल्यानंतर दोघांनीही शाळा न्यायाधिकरण यांच्या न्यायालयात अपिल केले होते. त्यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर व अन्य दोघांनी न्यायालयात फिर्यादी खंडाळे व शेरखाने यांच्याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे सांगत वेतनवाढ रोखलेली नसताना खोटी व खोडसाळ माहिती देत न्यायाधिकरणाची दिशाभूल केली. ही माहिती खोटी आहे. जातीय द्वेषातून दोघांनाही वागणूक देत दोघांचेही नुकसान व्हावे या हेतूने या अधिकाऱ्यांनी न्यायालयात खोटी लेखी माहिती दाखल केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)