शिक्षण आयुक्‍त पदी विशाल सोलंकी यांची नियुक्‍ती

डॉ.बीपीन शर्मा यांची महाऊर्जामध्ये बदली
पुणे,दि.16 – राज्याच्या शालेय शिक्षण आयुक्‍तपदी वर्षही पूर्ण न झालेल्या डॉ.बीपीन शर्मा यांची शासनाकडून पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आसाम केडरचे विशाल सोलंकी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मात्र सोलंकी यांचे नाव एका आर्थिक घोटाळ्यात अडकल्याने त्यांच्यावर गुवाहटी येथे गुन्हाही दाखल झाल्याचे समोर येत आहे.
डॉ.बिपीन शर्मा यांची मागील वर्षी मे महिन्यात शालेय शिक्षण विभागात बदली झाली होती. डॉ. शर्मा यांनी याआधी पुण्यातील साखर आयुक्‍ताचा पदभार सांभळला होता. मात्र त्यांच्या बदलीला वर्षही पूर्ण होत नाही तोवरच त्यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण येथे बदली करण्यात आली आहे.
शिक्षण विभागात एका वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली कधी होते आहे याची वाट सर्व जण पहात असताना त्या अधिकाऱ्याची बदली मात्र तीन वर्ष होत नाही. मात्र एस.चोक्‍कलिंगम असो वा डॉ.बिपीन शर्मा असो अशा चांगल्या अधिकाऱ्यांची बदली काही दिवसांतच कशी होते अशी चर्चा सध्या शिक्षण वर्तुळात रंगते आहे.
गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत सरकारी धाकामुळे फारसे प्रकाशझोतात आले नसले तरीही डॉ.बिपीन शर्मा यांनी चांगले काम केले असल्याची चर्चा शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)