शिक्षण अर्धवट सोडल्याचे करिनाला दुःख

सध्या शाळा कॉलेजचे रिझल्ट लागण्याचा काळ सुरू आहे. दहावी- बारावीच्या परीक्षेमध्ये 95-95 टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या बातम्याही येत आहेत. पण कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांनी वाईट वाटून घेण्याची गरज नाही. कमी मार्क मिळूनही यशाची शिखरे पादाक्रांत केलेले अनेकजण असतात. मार्कांच्या आधारे टॅलेंटचे मोजमाप केले जाऊ शकत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे करिना कपूर आहे.

सध्या “वीरे दी वेडिंग’च्या यशाचा आनंद उपभोगणाऱ्या करिना कपूरला मात्र आपले शिक्षण अर्धवट सोडल्याचे खूप दुःख होते आहे. आपण शहरात राहणारे असो, वा गावामध्ये, आपले शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे, असे करीनाला आता वाटायला लागले आहे. शिक्षणाशिवाय आजच्या जगामध्ये टिकाव लागणे अवघड आहे. शिक्षणामुळे व्यक्‍तीमध्ये खूप फरक पडतो. हा फरक व्यक्तीच्या पूर्ण पर्सनॅलिटीमध्येच बदल घडवून आणू शकतो. त्यासाठीच आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खूप पाठपुरावा करायला हवा. मुलांच्या शाळा, कॉलेजच्या शिक्षणासाठी मुलांना सातत्याने प्रोत्साहन देत राहिले पाहिजे, असे करीना म्हणते.

-Ads-

आपल्या ऐन उमेदीच्या काळात सिनेमाकडे आकर्षण वाढल्यानेच करीनाने आपले शिक्षण अर्धवट सोडले. वयाच्या 20 व्या वर्षी तिने ऍक्‍टिंग करिअरला सुरुवात केली. त्यामुळे ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर ईच्छा असूनही तिला पुढच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देता आले नाही. त्यानंतर लग्न आणि आता आई झाल्यावर तर शिक्षणाकडे लक्ष देणेच शक्‍य नाही, याची तिला जाणीव झाली. “वीरे दी वेडिंग’नंतर लगेचच करण जोहरच्या बॅनरच्या एका सिनेमात करीना काम करते आहे. करिनाबरोबर काम करण्याची करण जोहरची खूप दिवसांपासूनची ईच्छा होती. त्यानुसार बाबत चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र मधल्या काळात करिनाच्या प्रेग्नन्सीमुळे हा विषय बाजूला पडला. मात्र आता दोघांनी एकत्र काम करण्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करायला सुरुवात केली आहे. ही एक रोमॅंटिक कॉमेडी असेल. दोन जोड्यांच्या आसपास या सिनेमाची कथा फिरत असेल. यातील एक जोडपे नवविवाहित आणि दुसरे मुलाबाळांसह संसारात रमलेले असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)