शिक्षणावर फक्‍त साडेतीन टक्केच खर्च

गिरीश कुबेर : देश महासत्ता होण्यासाठी शिक्षणात मोठी गुंतवणूक हवी

राजगुरुनगर– अमेरिका महासत्ता होण्यामागे त्यांच्या एकूण अर्थव्यवस्थेतील 13 टक्के वाटा शिक्षणावर होणारा खर्च असून भारतात हेच प्रमाण साडेतीन टक्के एवढे कमी आहे. तेव्हा भारताला महासत्ता व्हायचे असेल तर शिक्षणात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून उत्तम निरोगी शिक्षणव्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी केले.
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत “भारत एक महासत्ता’ या विषयावर बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे संचालक शांताराम घुमटकर, ऍड. मुकुंद आवटे, बाळासाहेब सांडभोर, सुशील शिंगवी, मुरलीधर खांकटे, प्राचार्य डॉ.एस. बी. पाटील, व्याख्यानमाला समिती अध्यक्ष ऍड. राजमाला बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे व ग्रामस्थ उपस्थित होते.
गिरीश कुबेर म्हणाले की, भारताला भविष्यात महासत्ता व्हायचे असेल तर शिक्षणातील गुंतवणूक, उद्योगशीलता, औद्योगिकरण, संपत्ती निर्मिती, उर्जानिर्मिती, व्यवस्थांचे सक्षमीकरण आदी मुद्द्यांखूप काम करण्याची गरज आहे. यासाठी सरकारने उद्योगांना गती देऊन संपत्तीनिर्मितीला महत्त्व द्यायला हवे. उद्योगशिलतेमुळेच आज महाराष्ट्राएवढा असणारा जर्मनी महासत्ता झाला असून तो देश आर्थिकदृष्ट्या भारताच्याही पुढे आहे. आपल्या देशाचा विकास व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेतून होणार नसून त्यासाठी समाजकेंद्रित यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. आपल्याकडे नियम मोडण्याच्या क्षमतेचा संबंध व्यक्‍तीच्या कर्तृत्वाशी जोडला गेल्याने व्यवस्था निर्माण झाल्या नाहीत. त्यासाठी सार्वजनिक जीवनातील सर्वच व्यवस्थांचे सक्षमीकरण आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.
देशाला आवश्‍यक असणाऱ्या इंधनापैकी 82 टक्के इंधन आपल्याला आयात करावे लागत असल्याने, तो अर्थव्यवस्थेवर ताण आणणारा मुद्दा आहे. तेलाच्या दरात एका डॉलरने घट झाली तर केंद्राचे 8500 कोटी रुपये वाचतात. त्यामुळे उर्जानिर्मितीवर भर देणे काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

  • …हा योगायोग नाही
    जागतिकीकरण आणि बाजारपेठा यातील संबंध समजून सांगताना गिरीश कुबेर म्हणाले की, 1992 नंतर भारताने जागतिकीकरण स्वीकारल्यावर भारतातील मुली विश्‍वसुंदरी होऊ लागल्या. पण हा योगायोग नसून तर जगातील अनेक सौंदर्यप्रसादाने तयार करणाऱ्या कंपन्यांना भारत बाजारपेठ म्हणून उपलब्ध झाल्याचा तो परिणाम असल्याचे त्यांनी नमूद केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)