शिक्षणामुळेच देश घडतो : डॉ. रघुनाथ माशेलकर

तिसऱ्या नॅशनल टीचर्स कॉंग्रेसचा समारोप

पुणे – वर्तमान काळात तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. शिक्षकांनी तंत्रज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात पुढाकार घ्यावा. गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रमाची निर्मिती करावी लागणार आहे. शिक्षणामुळेच देश घडत असतो. ज्या देशात शैक्षणिक विकास नाही, त्या देशाला भविष्य नाही. आपल्याला जागतिक कसोटीवर उतरणारी खुली विद्यापीठे तयार करायची आहेत, असे उद्‌गार आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे आयोजित तिसऱ्या नॅशनल टीचर्स कॉंग्रेसच्या समारोप सत्रात ते बोलत होते. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. चंद्रकांत पांडव, तेरीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे, माजी आरएफएस अधिकारी डॉ. अनिल त्रिगुणायत, दीपक फर्टीलायझर्सचे रवींद्र राजू, कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, नॅशनल टीचर्स कॉंग्रेसचे संस्थापक प्रा. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आय. के. भट आदी उपस्थित होते. याप्रसंगी व्हीआयटीचे संस्थापक जी. विश्वनाथन, डॉ. बाला बालचंद्रन आणि डॉ. कोटा हरीनारायण यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माशेलकर म्हणाले, शिक्षक हा देशाचे भविष्य घडविणारा असतो. दिक्षांत याचा अर्थ शिक्षांत नसून जन्मभर शिकत राहणे हा त्याचा खरा अर्थ आहे. भविष्यात सकारात्मक दृष्टीकोनावर आधारित आणि संशोधनात्मक शिक्षणाची आवश्‍यकता असणार आहे. समीक्षात्मक विचार, सृजनात्मकता, भावनाप्रधान शिक्षण आणि कामातील एकाग्रता हे यशस्वी होण्याचे मार्ग आहेत. आपल्या सीमेच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची सवय सर्वांना असावी. शिक्षण हेच भविष्य आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अनेक गरीब; परंतु गुणवंत विद्यार्थी भारतात आहेत. त्यांना पाठिंबा देणे आवश्‍यक आहे.

डॉ. जी. विश्वनाथन म्हणाले, भारतात युवकांची संख्या अधिक असल्यामुळे शिक्षकांसमोर त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन आहे. विदेशात विद्यार्थ्यांना शिक्षक बनण्याची इच्छा असते. मात्र, भारतात विद्यार्थी या पेशापासून दूर जात आहे. याला आपले राष्ट्रीय धोरण कारणीभूत आहे. बालचंद्रन म्हणाले, भविष्यात भारत एक सूपर टीचर म्हणून उदयास येईल. कारण भारतीय युवकांकडे ज्ञानाचे भांडार आहे. हेच ज्ञानाचे भांडार जगाला ज्ञानी पिढी देईल. नवीन तंत्रज्ञानाची कास धरत युवा पिढीने शिकावे.

राहुल कराड म्हणाले, भारतात स्वायत्त विद्यापीठांना तुच्छतेच्या नजरेने पाहिले जाते. मात्र, जगात इतिहास स्वायत्त विद्यापीठांनीच घडवला आहे. भविष्यात जगातील उच्च शिक्षणाचे मॉडेल तयार करावे लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)