शिक्षणाबरोबर क्रीडा प्रकारात सहभागी व्हा

शिवाजी गवारे : श्री समर्थ स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

चिंबळी- ग्रामीण भागातील इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर क्रीडाक्षेतील विविध खेळांची आवड निर्माण झाली पाहिजे त्यासाठी क्रीडा क्षेत्रातील विविध खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी गवारे यांनी केले.
कुरुळी (ता. खेड) येथे आनंद इंग्लिश मीडियम स्कुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय छात्र सैनिक शिबिरातील यशस्वी विद्यार्थ्यांना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव डॉ. अनिल काळे, प्राचार्य अनिता टिळेकर, सरला सोनवणे, डी. बी. गायकवाड, आर. डी. महाडिक, शिवाजी गवारे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन, पदक प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. शिबिरात मरकळ येथील पवनसुत इंग्लिश मीडियम स्कूल, चाकण येथील पायस मेमोरियल स्कूल, मोई येथील इंदिराजी माध्यमिक विद्यालय, चिंबळी फाटा येथील श्रीसर्मथ इंल्गिश मीडियम या स्कूलमधील सुमारे 300 विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरात चिंबळी फाटा येथील श्रीसमर्थ इंग्लिश मीडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यात आर. एस. पी.मध्ये सेंकेड कंमाडर : भूमी शिंगारे, प्लाटून लिडर : तनुला बुद्धेवार, सिग्नल पीटी : ओमप्रकाश शिवपुजे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक आर. एन. वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे, प्राचार्य अनिता टिळेकर यांनी अभिनंदन व कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)