शिक्षणाबरोबरच खेळालाही महत्त्व द्यावे -गावडे

टाकळी हाजी-शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शारीरिक विकास महत्त्वाचे असल्याने खेळाला महत्त्व देणे गरजेचे आहे, असे जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे यांनी प्रतिपादन केले. एस. पी. गावडे इंग्लिश मेडियम स्कूल येथे वार्षिक स्पोर्ट डे नुकताच साजरा करण्यात आला. त्यामध्ये विविध खेळ, कसरती, कराटे प्रात्यक्षिक अशा विविध प्रकारचे खेळांचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य साईनाथ कानडे व सर्व शिक्षकांनी केले. या कार्यक्रमासाठी जि. प. सदस्य सुनिता गावडे, बापूसाहेब गावडे विद्यालयाचे प्राचार्य आर. बी. गावडे व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य साईनाथ कानडे यांनी तर निता खामकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)