शिक्षणाने समाज मन समृद्ध होते – डॉ. उत्तमराव भोईटे

पुणे – महाराष्ट्राला समाज प्रबोधनाची मोठी परंपरा आहे आणि समाज मन समृद्ध करण्याचे काम शिक्षणातून होते, असे प्रतिपादन भारती विद्यापीठाचे कार्यकारी संचालक डॉ. उत्तमराव भोईटे यांनी भारती विद्यापीठाच्या महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभात केले. यावेळी व्यासपीठावर डॉ. हरीश वनकुद्रे, डॉ. सविता इटकर, डॉ. दीपाली गोडसे, डॉ. एस. आर. पाटील उपस्थित होते.

डॉ. भोईटे म्हणाले, समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. स्त्री ही त्याग नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मूर्ती आहे. ती कोणत्याच बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाही. पारंपरिकरित्या पुरुषांची समजली जाणारी क्षेत्रे आता महिला काबीज करीत आहेत. सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून किरण बेदी, मीरा बोरवणकर, अंजू जॉर्ज, सानिया मिर्झा आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत.

स्त्रीची प्रतिष्ठा फक्त वीर पत्नी अथवा वीर माता होण्यात नाही, तर वीर स्त्री होण्यास आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी कम्प्युटर, इलेट्रॉनिक टेली कम्युनिकेशन, इन्फॉर्मशन टेकनॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशोमती धुमाळ यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)