शिक्षणाधिकाऱ्यांच्या आश्‍वासनानंतर उपोषण मागे

पिंपरी – शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य मिळावे, ही मागणी घेऊन दि. 22 ऑगस्टपासून सुभाष जिनवाल उपोषण करत होते. शिक्षण अधिकाऱ्यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर जिनवाल यांनी उपोषण मागे घेतले.

शिक्षण हक्‍क कायद्यानुसार मोफत शालेय साहित्य मिळायला हवे होते; परंतु काही इंग्रजी शाळांनी या नियमांना केराची टोपली दाखवली. त्याच्या निषेधार्थ जिनवाल पिंपरीतील डॉ. आंबेडकर चौकात उपोषणास बसले होते. उपोषणाची प्रशासनाने गंभीर दखल घेवून तिसऱ्या दिवशी शिक्षण अधिकाऱ्यांनी लेखी आश्‍वासन देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

खराळवाडी येथील सुभाष जिनवाल यांच्या मागण्यांबाबत पालिका अतिरिक्‍त आयुक्‍त अच्युत हंगे यांनी माहिती घेतली आणि याबाबत महापालिका शिक्षणाधिकारी बी. एस. आवारी यांना उपोषणस्थळी जाऊन चर्चा करण्याची सूचना केली. शिक्षण अधिकारी आवारी यांनी संबंधित शाळांची तपासणी करून शिक्षण हक्‍क कायद्याची अंमलबजावणी न करणारांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. आंदोलनास हेल्पिंग हॅण्ड फाउंडेशन, सम्यक विद्यार्थी आंदोलन यांनी पाठिंबा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)