शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांची गच्छंती…

पदभार काढला : शिक्षण विभागात अनियमित कारभार भोवला


मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कारवाई 

पुणे – जिल्हा परिषद शिक्षण विभागात सुरू असलेल्या अनियमित कारभारात शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांचाही सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. याबाबत दराडे यांना बजावलेल्या नोटीशीला त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही, असा ठपका ठेवत मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी शिक्षणाधिकारी दराडे यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडील शिक्षण विभागाचा पदभार काढून घेतला.

आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांचे शासन अनुदान बिल मंजूर रक्कम अदा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कार्यालय अधीक्षक शिल्पा मेनन आणि क्‍लार्क महादेव सारुख यांना 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यावेळी तपासादरम्यान मेनन हिने शैलजा दराडे यांच्या सांगण्यावरून ही लाच घेतल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली. शिक्षण विभागातील अनागोंदी कारभार, शिक्षणाधिकारी यांचे चुकीच्या पध्दतीने सुरू असलेले कामकाज याचा निषेध जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षांनी केला. यावेळी दराडे यांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. यानंतरही आरटीई अनुदान वितरणात झालेला घोळ आणि अधिकार नसतानाही खाजगी शाळेतील शिक्षकांना मान्यता देण्याचे गंभीर प्रकार शिक्षण विभागात झाले होते.

या गंभीर प्रकारांची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी शैलेजा दराडे यांना नोटीस बजावली होती. तसेच या सर्व प्रकाराबाबत अहवाल देण्याचे आदेशही दिले होते. मात्र, या अहवालात दराडे यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने तसेच दराडे यांना भविष्यात पदावर ठेवल्यास आणखी अनियमित गोष्टी होऊन जिल्हा परिषदेची प्रतिमा मलिन होऊ शकते, यामुळे मांढरे यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 9161 चे कलम 95 (ख) द्वारे दराडे यांच्या कडील शिक्षण विभागाचा कारभार काढून घेतला. त्यांच्या जागी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे हे त्यांच्या विभागाचे कामकाज पाहणार आहेत.

((((((((( कोट )))))))))
शिक्षण विभागात सुरू असलेल्या अनियमित कारभाराबाबत शिक्षणाधिकारी यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. तसेच त्यांनी नोटीशीला दिलेले उत्तरही समाधानकारक नाही. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सूरज मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)