शिक्षणातील बदल विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत 

ऍड. अनिल मडके : शहरटाकळी विद्यालयात 10 वी, 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
भावीनिमगाव  – शैक्षणिक क्षेत्रात आज मोठे बदल झाले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थ्यांनी सतत बदल होणाऱ्या अभ्यासक्रमाबाबत अपडेट राहिले पाहिजे. 10 वी नंतरच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. पालकांनी परिस्थितीनुसार पाल्यांना मदत केली पाहिजे, असे मत शहरटाकळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष ऍड. अनिल मडके यांनी व्यक्‍त केले.
शेवगाव तालुक्‍यातील शहरटाकळी विद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या 10 वी, 12 वी परीक्षेत प्रथम आलेल्या तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ऍड. मडके बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य गणपत शेलार होते.
कार्यक्रमास मजलेशहर सरपंच रवींद्र लोढे, शहरटाकळी सरपंच अलका शिंदे, ढोरसडे सरपंच सुभाष वाघमारे, विक्रम लोढे, वाय. डी. कोल्हे, रवींद्र मडके, रावसाहेब गवळी, प्रा. बाबासाहेब काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य गणपत शेलार म्हणाले, की संस्थेचे अध्यक्ष ऍड. शिवाजीराव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरटाकळी विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात चांगला ठसा उमटविला. ग्रामीण भागातील या विद्यालयाने अनेक गुणवान विद्यार्थी घडवले आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य, सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे, तर अंगी प्रामाणिकपणा बाळगून कष्ट करण्याची तयारी ठेवल्यास यशाचा मार्ग सोपा होतो.
प्रास्ताविक विद्यालयाचे पर्यवेक्षक रामकिसन धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुरेश तेलोरे यांनी केले. प्रा. सर्जेराव निकाळजे यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)