शिक्षणाचा हक्क हिरावणाऱ्या सरकारची मती भ्रष्ट – एन डी. पाटील

कोल्हापूर – गोरगरिबांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणाऱ्या या सरकारची मती भ्रष्ट झाली आहे. हे सरकार मुरदाड असल्याची टिका ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी केलेली आहे. ते कोल्हापुरात आयोजित केलेल्या शिक्षण वाचावा महामोर्चा प्रसंगी बोलत होते. “शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्या वतीने आज कोल्हापुरात शिक्षक आणि पालकांचा विराट मोर्चा काढण्यात आला.

राजर्षी शाहू महाराजांनी शंभर वर्षांपूर्वी केलेले शैक्षणिक धोरण, सर्वसामान्यांच्या शाळा वाचविण्यासाठी आणि राज्य सरकारच्या अशैक्षणिक धोरणाविरोधात शिक्षण वाचवा नागरी कृती समिती, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर जिल्हा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने आज गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा “शिक्षण वाचवा’ महामोर्चा काढण्यात आला. या महामोर्चात शहरासह जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील हजारो विद्यार्थी, पालक, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षकांनी सहभागी झाले होते. खासगी कंपन्यांना शाळा चालविण्यास देण्याच्या धोरणाला यावेळी कडाडून विरोध करण्यात आला.

ज्या राज्यात राजर्षी शाहूंनी शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. त्याच कोल्हापुरात शिक्षण बचावासाठी मोर्चा निघणे म्हणजे शिक्षण खात्यांचे धिंढवडे निघण्यासारखे आहे. त्यामुळे राज्य सरकारची मती भ्रष्ट झाली आहे, अशी टिका ज्येष्ठ नेते डॉ. एन डी. पाटील यांनी केली.

राज्य शासनाने कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर शाळांचे खासगीकरण करण्याचा घाट घालून याचा फटका ग्रामीण भागातील वड्या वस्त्यांच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या महामोर्चामुळे जिल्ह्यातील शाळा एक दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)