शिक्षणसंस्थांनी कोणतीही अप्रिय घटना अगोदर मीडियात नेऊ नये: दिल्ली सरकार 

नवी दिल्ली: कोणत्याही अप्रिय घटनेची माहिती अगोदर मीडियात नेऊ नये अशा सूचना दिल्ली सरकारने राजधानीतील सर्व शाळांना दिल्या आहेत. हिंसा, दुर्घटना, धरणे, झगडे, आग, विरोध, आंदोलन, चोरी, दंगा, छेडछाड, आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न आदी घटनांची माहिती अगोदर देऊ नये असा आदेश केंद्र सरकारने दिल्लीतील सर्व शाळाप्रमुखांना दिले आहेत. अशा घटनांची माहिती ताबडतोब शिक्षण विभागाच्या त्या वेळी उपलब्ध असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावी. त्यामुळे त्वरित कारवाई करणे शक्‍य होऊन शिक्षण विभागाची बदनामी होणार नाही वा शिक्षण संस्थाची मानहानी होणार नाही.
एनडीएमसी च्या एका शाळेच्या आवारात एका इलेक्‍ट्रिशियनने केलेल्या कथित बलात्कारासंदर्भात हा आदेश महत्त्वपूर्ण आहे. शिक्षण संचलनालयाने सर्व शाळा प्रमुखांना अप्रिय घटनांची माहिती सर्वप्रथम शिक्षण विभागाच्या उपलब्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देण्याबाबत एक परिपत्रक पाठवले आहे. अप्रिय घटनांची माहिती प्रथम मीडियात गेल्यामुळे वेळेवर उपयुक्त कारवाई केली जाऊ शकत नाही, आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि संरक्षण करण्यातील धोका वाढतो.
जर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब अहवाल देता येत नसेल, तर ताबडतोब टेलिफोनने माहिती द्यावी आणि त्याच दिवशी खुलासेवार अहवाल पाठवावा, असे या आदेशात सांगण्यात आले आहे. मागील आठवड्यात दुसऱ्या इयत्तेतील एका विद्यार्थिनीवर बलात्काराच्या कथित घटनेनंतर शाळेच्या आवारातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. बलात्काराच्या एका प्रकरणात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न समोर आला होता आणि दिल्ली महिला आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्ली पोलीसांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले होते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)