शिक्षणसंस्थांच्या भ्रष्टाचारात शिक्षणाधिकारीच सहभागी

आळंदी येथील अधिवेशनात शिक्षणमंत्री तावडे यांचा घरचा आहेर

आळंदी- देशाला भ्रष्टाचारमुक्‍त करण्याचा नारा देशभरात भाजप नेते देत आहेत, असे असताना महाराष्ट्रात शिक्षण विभागात शिक्षणसंस्थांच्या भ्रष्टाचारात शिक्षणाधिकारी सहभागी असल्याचा खळबळजनक आरोप खुद्द राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
आळंदी (ता. खेड) येथे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे 24 वे राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्‌घाटन प्रसंगी तावडे बोलत होते. अधिवेशनाच्या प्रारंभी दिपप्रज्वलन, इतस्त:वन व स्वागत समारंभात श्री ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेच्या वतीने विनोद तावडे यांना पुणेरी पगडी,शाल, श्रीफळ व तुळशीची माळ घालून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी केंद्रीय दळणवळण मंत्री विजय नवल पाटील, स्वागताध्यक्ष गणपतराव बालवडकर, कार्याध्यक्ष सुरेश वडगावकर, जिल्हा.परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील, सचिव अजित वडगावकर आदींसह सर्व क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विनोद तावडे म्हणाले, की राज्यातील हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय राज्य सरकार घेत आहे. सर्वच शिक्षणसंस्था भ्रष्टाचार करत नाहीत हे जरी मान्य असले तरी ज्या संस्था भ्रष्टाचार करतात, त्या शिक्षणाधिकाऱ्याला सोबत घेतात. घेतात का नाही? असा प्रश्‍न तावडेंनी उपस्थितांना केल्यावर अनेकांनी माना डोलावून होकार दिला.
शालेय जीवनापासून मंत्री झाल्यापर्यंतची अनेक कडू-गोड आठवणींची उदाहरणे देत दिर्घकाळ आपले भाषण झाल्यानंतर ठिक ठिकाणीच्या प्रोटोकॉल प्रमाणे येथेही भाषणाअंती प्रश्‍नोत्तरांच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर शिक्षकांच्या देखील व्यथा आणि कथा काही काळातच जाणुन घेतल्या. शिक्षणाची ही धोकंपट्टी कुठेतरी थांबली पाहिजे, असे सरतेशेवटी सांगुन उपस्थितीतांची मने तावडे यांनी जिंकुन घेतली.

  • तावडे भ्रष्टाचाराचे साक्षीदार?
    स्वत: शिक्षण मंत्री म्हणून शिक्षण खात्याचा कारभार संभाळत असताना शिक्षण खात्यातील आधिकारी, संस्था चालक भ्रष्टाचार करत आहे, ही बाब स्वत शिक्षण मंत्री म्हणून विनोद तावडेंना माहीत आहे. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराचे साक्षीदार आहात, असे म्हणत प्रवेश प्रक्रियेत भ्रष्टाचार होतो, हे तावडे यांनी कबूल करायला भाग पाडले. यावरच तोडगा म्हणून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवत असल्याचे शिक्षणसंस्था चालकांना पटवून देण्याचा प्रयत्न यावेळी शिक्षणमंत्री तावडेंनी केला.
  • कोणीही उठवे अन्‌ मोर्चे काढावे
    कायदा सुव्यवस्थेचा दुरुस्तीचा कायदा केला तो केवळ संस्था चालकांसाठी. खरे बोलू, की वाईट बोलू असाच स्वभाव असल्याने कोणीही उठावे अन्‌ मोर्चे, आंदोलने मंत्रालयावर आणावीत असे सत्र सध्या सुरू झाले असल्याचे शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)