शिक्षक हा समाजात आदराचा माणूस, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले मत

वडज येथे गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम

ओतूर, दि. 13 (वार्ताहर) – शिक्षक हा समाजात आदराचा माणूस असून ते भावी पिढी घडवण्याचे काम करतात. शिक्षकांच्या कार्याचा गौरव होणे आवश्‍यक आहे. शिक्षक वर्षभर चांगले काम करतात. त्यांच्या कामांचे मूल्यमापन व्हावे म्हणून हा गुणवंत पुरस्कार दिला जातो. शिक्षकांनी अथक काम पुढे चालू ठेवावे जेणेकरून जिल्हा परिषदेच्या शाळा दर्जदार होतील, असे मत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

-Ads-

2018-19 चा जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम वडज (ता. जुन्नर) येथे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमात जुन्नर तालुक्‍याचे सभापती ललिता चव्हाण, उपसभापती उदय भोपे, शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, गुलाब पारखे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी राज्य पुरस्कार प्राप्त 1 शिक्षक, जिल्हा पुरस्कार प्राप्त 2 शिक्षक, अध्यक्ष चषक पुरस्कार प्राप्त 2 शाळा व शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या 3 मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच 41 प्राथमिक व 13 माध्यमिक शिक्षक, 1 विस्तार अधिकारी, 2 केंद्र प्रमुख, शिक्षणचे लिपीक 1, विषय तज्ज्ञ 1 एकूण 60 जणांना तालुका गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी पी. एस. मेमाणे यांनी केले. सूत्रसंचालन सुनिता वामन व भाऊसाहेब खाडे यांनी केले तर विस्तार अधिकारी के. बी. खोडदे यांनी आभार मानले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)