शिक्षक सेवा वर्गीकरणात गोलमाल?

पिंपरी – शिक्षण समितीने जिल्हांतर्गत शिक्षक सेवा वर्गीकरणाचा ऐनवेळचा विषय मंजूर केला. मात्र, जिल्ह्यातील 131 पैकी 50 शिक्षकांना महापालिका शिक्षण विभागाच्या सेवेत दाखल करुन घेण्याचा चुकीचा निर्णय समिती सदस्यांना अंधारात ठेवून झाल्याचा आरोप राष्ट्रवादी व शिवसेनेच्या सदस्यांनी केला. तसेच हा प्रस्ताव विखंडीत करण्याची मागणी केली आहे.

शिक्षण समितीची पाक्षिक सभा गुरुवारी (दि. 4) पार पडली. सभापती प्रा. सोनाली गव्हाणे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. उपसभापती शर्मिला बाबर यांनी ऐनवेळी जिल्ह्यांतर्गत शिक्षक सेवा वर्गीकरणाचा विषय ऐनवेळी सभेत दाखल केला. या विषयात किती शिक्षकांची सेवा महापालिकेत वर्ग करावयाची आहे, याचा उल्लेख नव्हता. मात्र, 131 रिक्त जागांपैकी 51 जागांवर जिल्ह्यातील शिक्षकांची नियुक्ती करण्याचे ठरले असून, प्रत्येक नियुक्तीसाठी समिती सदस्यांनी पाच ते आठ लाख रुपये घेतले असल्याचा आरोप सदस्यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन समितीच्या कारभारावर या सदस्यांनी टीका केली.

-Ads-

पती-पत्नी एकत्रीकरण, एकतर्फी सेवा वर्गीकरण अशा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांचा महापालिका शाळेत वर्गीकरण करण्याचा विषय आयत्यावेळी सभेसमोर दाखल करण्यात आला. एकूण 131 शिक्षकांना महापालिकेच्या शिक्षण विभागात सामावून घेण्याची बाब विचाराधीन आहे. आहे. एवढा महत्त्वाचा विषय असताना, तो ऐनवेळी सभेत दाखल करण्याचे कारण काय? त्यासाठी एवढी घाई कशासाठी? असे प्रश्‍न या सदस्यांनी उपस्थित केले. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी वेळ देण्यात यावा. तोपर्यंत यावर स्वाक्षरी करु नये, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आयुक्तांकडे केली. मात्र, अभ्यास केल्याशिवाय यावर आपण स्वाक्षरी करणार नसल्याची भुमिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हा विषय मंजूर केला. याशिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्य या लेखाशिर्षावरील रक्कम शाळांमध्ये ग्रीन बोर्ड बसविण्यासाठी वर्ग करण्याचा समितीचा निर्णय देखील चुकीचा असल्याचा आरोप या सदस्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)