शिक्षक सहकारी पतसंस्थेचा 8.44 टक्‍के लाभांश घोषित

बेल्हे- जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची 95 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष सयाजी हाडवळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. सभेत संस्था व सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. सभासदांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास 12 लाख रूपये मदत देण्याचा तसेच कर्जावरील व्याजदर 9.60 आणि सभासद मृत्यू मदत निधी वर्गणी प्रती सभासद तीस हजार रूपये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पतसंस्थेला सतत ऑडिट वर्ग अ प्राप्त असून या वर्षी 2 कोटी 15 लाख रूपयांचा नफा झाला आहे. यावेळी सभासदांना 8.44 टक्‍के लाभांश जाहिर करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)