शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये सुसंवादाची गरज- आयुक्‍त श्रावण हर्डीकर

पिंपरी- शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सतत संवाद होण्याची गरज आहे. समाजातील उद्याचा समर्थ नागरिक घडविण्यासाठी आजचा विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. तसेच, समाजावर राजकीय नाही तर अध्यापकांची पकड असल्यास समाज खऱ्या अर्थाने समृध्द बनू शकेल, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त करत राजकीय नेत्यांना कानपिचक्‍या दिल्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागा’तर्फे भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेत हर्डीकर बोलत होते. यावेळी, महापालिकेच्या शिक्षण सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, उपमहापौर सचिन चिंचवडे, शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विभागीय उपसंचालक मीनाक्षी राऊत, उपसभापती शर्मिला बाबर, प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे, शारदा सोनवणे, आश्‍विनी चिंचवडे, विनया तापकीर व शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)