ओतूर- ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळ ओतूर व ब्रिलियंट पब्लिकेशन्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वी चे विद्यार्थी व त्यांचे पालक व शिक्षकांसाठी चैतन्य विद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे यांनी दिली. या कार्यशाळेस चैतन्य विद्यालय ओतूर, सरस्वती विद्यालय उदापूर, पुष्पावती विद्यालय डिंगोरे, सावित्रीबाई फुले विद्यालय ओतूर, शिवनेर विद्यालय धोलवड येथील 600 विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेते व विज्ञान विषय तज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांनी बदलत्या अभ्यासक्रमानुसार पालकांची भूमिका व कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. उमेश प्रधान यांनी इंग्रजी विषय कृतीपत्रिका, लेखन कौशल्य, व्यवहारी इंग्रजी या विषयी मार्गदर्शन केले. आपटे प्रशालेचे गणित विषय तज्ञ प्रा. वसंत गवळे यांनी गणिताच्या संकल्पना तसेच सामान्यीकरण, संबोध या विषयी सखोल माहिती दिली. तसेच विद्यार्थी व पालकांनी विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण केले. याप्रसंगी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल तांबे, प्रदीप गाढवे, पंकज घोलप, रघुनाथ तांबे, सरपंच प्रमिला शिंदे समवेत शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे यांनी केले. अजीत डांगे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)