शिक्षक विकास मंडळाकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

नगर – ढगफुटीमुळे आलेल्या पुराने गावातील सर्वंच मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांचे प्रपंच उघड्यावर आले होते. त्यात विद्यार्थ्यांचे शालेय साहित्यही पुरात वाहून गेले होते. चांदेकसारे (आनंदवाडी, ता. कोपरगाव ) गावातील उद्‌ध्वस्त कुटुंबातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाजिक जाणिवेतून विकास मंडळाने मदतीचा हात दिलेला आहे.
या शाळेतील पहिली ते पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या सर्वंच विद्यार्थ्यांना स्कुल बॅग, वह्या, शूज, सॉक्‍स, शालेय साहित्य वाटप करून विकास मंडळाने या गोरगरीब मुलांच्या चेहऱ्यावर हसू निर्माण केले. गेल्या दोन वर्षांपासून विकास मंडळाने विविध सामाजिक उपक्रम राबवून गरीब, गरजूंना तसेच वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या संस्थाना मदतीचा हात देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. चांदेकसारे शाळेतील मुले या अनोख्या भेटीने हरखून गेली होती.
या प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसयाताई होन, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास होन, शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष रावसाहेब रोहोकले, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष कैलास चिंधे, उच्चाधिकारचे अध्यक्ष रावसाहेब सुंबे, विकास मंडळाचे विश्वस्त रमेश दरेकर,सर्जेराव घोडके, बॅंकेच्या उपाध्यक्ष विद्युल्लता आढाव, संचालक बाबा खरात, साहेबराव अनाप, सलीमखान पठाण, नाना बडाख, राजू राहाणे, विकास मंडळाचे माजी उपाध्यक्ष मारुती गायकवाड, सुनील ढेपले, आर. के. ढेपले, विलास गवळी, सुभाष गरुड, योगेश वाघमारे, अशोक गुरव, सतीश पठारे, शाम आढाव, सुनील गायकवाड, उपसरपंच केशवराव होन, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव चव्हाण, माजी सरपंच मतीन शेख, राहुल होन, सुधाकर होन, गणेश होन, धीरज बोरावके आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)