शिक्षक वर्गीकरण प्रस्ताव पडताळणीनंतर कार्यवाही

पिंपरी – जिल्ह्यांतर्गत शिक्षक वर्गीकरणाच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे. मात्र, महापालिका सेवा प्रवेश नियमावलीत अशी तरतूद नाही. हा प्रस्ताव प्रशासनाकडून पडताळणी केल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. त्यामुळे ऐनवेळच्या या प्रस्तावावरील विरोधकांचे आरोप व सत्ताधाऱ्यांच्या स्पष्टीकरण अधांतरीच राहिले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागात सेवेत कार्यरत असलेल्या शिक्षकांना महापालिकेच्या शिक्षण विभागात जिल्हांतर्गत शिक्षक वर्गीकरणांतर्गत सामावून घेण्याचा ऐनवेळचा प्रस्तावावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आर्थिक-देवाण घेवाणीचे आरोप केले होते. त्यावर सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी स्पष्टीकरण देखील दिले होते.
या प्रस्तावाबाबत विचारले असता, जिल्ह्यांतर्गत शिक्षक वर्गीकरणाची तरतूद राज्य सेवेत असली, तरी देखील अशी कोणतीही तरतूद महापालिका सेवा प्रवेश नियमावलीत नाही. हा प्रस्ताव अद्यापही माझ्यापर्यंत आलेला नाही. मात्र, या प्रस्तावाची पडताळणी करूनच त्याची कार्यवाही करावयाची की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)