शिक्षक भरती नसल्यामुळे डी.एड, बी.एड पदवीधारक आंदोलनाच्या तयारीत

पुणे – गेल्या 6 वर्षांपासून शिक्षक भरती नाही. या दरम्यानच्या कालावधीत हजारो डी.एड, बी.एड पदवीधारक उत्तीर्ण होऊन बाहेर पडले आहेत. परंतु, शिक्षण विभाग केवळ पात्रता परीक्षा, अभियोग्यता चाचणी अशा परीक्षा घेण्यापलीकडे काहीच कार्यवाही करताना दिसत नाही. त्यामुळे पात्रताधारकांमध्ये नैराश्‍याची भावना निर्माण झाल्याचे डीएड., बीएड. पात्रताधारकांनी सांगितले.

प्राध्यापक, प्राचार्यांच्या भरतीवरील स्थगिती उठविण्यात आली. त्यानंतर आता शिक्षक भरतीवरीलही स्थगिती उठेल, अशी अपेक्षा पात्रताधारकांना वाटत होती. मात्र, ती फोल ठरली आहे. राज्यात सुमारे 7 लाख डी.एड, बी.एड. पात्रताधारक आहेत. शिक्षक भरतीवर घालण्यात आलेली स्थगिती उठवली जाईल, या आशेवर ते आलेला दिवस ढकलत आहेत. मात्र, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक भरती करण्यासाठी दिलेली कुठलीच आश्‍वासन पाळलेली नाहीत.

लवकरच शिक्षक भरतीला सुरूवात होईल असा शब्द त्यांनी दिला होता. मात्र, त्यांना तोही पाळता आला नाही. राज्यात शिक्षकांच्या एकूण रिक्त जागा किती आहेत, त्यापैकी किती जागा भरल्या जाणार आदींची कुठलीच माहिती पात्रताधारकांना मिळत नसल्याचे डी.एड, बी.एड. पात्रताधारक संघटनेच्या उपाध्यक्ष प्राजक्ता गोडसे यांनी सांगितले. संघटनेच्या वतीने सातत्याने शिक्षक भरतीवरील स्थगिती उठविण्यासाठी आंदोलन केले जात आहे. जिल्हास्तरावर तसेच शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांच्या कार्यालयासमोर अनेकदा धरणे आंदोलन करण्यात आले. तरीही शासनाला जाग येत नसल्याने पुन्हा एकदा येत्या 26 नोव्हेंबरपासून पात्रताधारकांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)