शिक्षक भरतीवरुन सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांच्यात घमासान

राष्ट्रवादीचे नेते फक्त शिक्षकभरती होत नाही, अशी सोशल मिडीयावर टिवटिव करतात- विनोद तावडे

‘मराठा आरक्षण’ मुद्दा आणून भरती पुढे ढकलतात आणि शिक्षकभरती होत नाही अशी सोशल मिडीयावर टिवटिव करतात

-Ads-

मंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षक भरतीवरून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना लक्ष केले. राज्यात २४ हजार शिक्षकांच्या रिक्त जागा सहा महिन्यांत भरण्याची घोषणा विनोद तावडे यांनी फेब्रुवारीत केली होती. अद्याप ही शिक्षक भरती झालेली नाही. दिवसरात्र या भरती परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या तोंडाला पाने का पुसली जात आहेत? , असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर विचारला.

दरम्यान, यावर तावडे आणि सुप्रिया सुळे यांच्यात ‘ट्विटर वार’ सुरु झाला आहे. विनोद तावडे म्हणाले, १५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी एकही पद भरले नाही. आज बहुतांश संस्थांचालक यांचेच आहेत. जे कोर्टात जाऊन सरकारच्या ऑनलाईन भरतीवर स्थगिती आणतात. मराठा आरक्षण हा मुद्दा आणून भरती पुढे ढकलतात. वर यांचेच नेते #शिक्षकभरती होत नाही अशी सोशल मिडीयावर टिवटिव करतात.

शिक्षणात राजकारण केलेले खपवून घेणार नाही. संस्थाचालकांनी कितीही प्रयत्न केले आणि विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी आमचे सरकार शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी खंबीरपणे उभे आहे. पद भरती होणार होणार होणार!, असा विश्वास त्यांनी दिला

What is your reaction?
2 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)