शिक्षक भरतीतील उमेदवारांचे अर्ज दुरूस्त होणार

21 सप्टेंबरपर्यंत पवित्र पोर्टल खुला राहणार

पुणे – राज्यातील शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवर एक संधी देऊनही ज्या उमेदवारांचे अर्ज दुरुस्त होऊ शकले नाही, अशा सर्वांना ते दुरुस्त करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. पुढील एक ते दोन दिवसांत हे पोर्टल दुरुस्तीसाठी खुल होणार असून 21 सप्टेंबरपर्यंत उमेदवार दुरूस्ती करू शकणार आहेत.

राज्यातील शिक्षक भरतीसाठी 1 लाख 91 हजार शिक्षकांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार प्रत्येकाला अर्ज भरण्यासाठी कालावधी ठरवून दिला होता. त्यानुसार शिक्षकांनी अर्ज भरले. मात्र, तरीही काही शिक्षकांचे अर्ज भरण्यात काही चुका झाल्या तर, काहींचे अर्ज अर्धवट भरले गेले. त्यामुळेच हे अर्ज दुरुस्त करण्यासाठी शासनाने आणखी मुदत वाढवून दिली होती. यासाठी पुन्हा एकदा शिक्षकांचे गट पाडून त्यांना ते अर्ज दुरुस्त करण्यासाठी कालावधी दिला होता. मात्र, दुरुस्तीसाठी दिलेल्या कालावधीत पोर्टलला तांत्रिक अडचणी आल्याचे उमेदवारांचे म्हणणे होते. त्यामुळेच ते अर्ज दुरस्त करू शकले नाहीत, अशीही व्यथा त्यांनी दैनिक प्रभातकडे मांडली. त्यामुळे अर्ज दुरुस्त करण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जावा, अशी मागणी उमेदवारांनी केली होती. त्यानुसार आता शासनाने यासाठी पुन्हा एक संधी देण्याचे निश्‍चित केले आहे.

ज्या उमेदवारांचे अर्ज अजुनही दुरूस्ती होणे बाकी आहे, अशा सेल्फ सर्टिफिकेशन न झालेल्या सर्वांचे अर्ज दुरुस्त करण्यासाठी एक 2 दिवसात संकेतस्थळ सुरू केली जाईल. 21 सप्टेंबरपर्यंत सर्व उमेदवार आपले अर्ज दुरूस्त करु शकणार आहेत. याची माहिती पोर्टलवरही देण्यात येईल.
– सुनिल कुऱ्हाडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)